किरीट सोमैया यांचे गंभीर आरोप आणि परिणाम

मुंबई
प्रतिनिधि

2009 मध्ये सोमय्यांनी कृपाशंकर सिंग यांच्यावर मधु कोडांशी संबंधित कंपन्यांशी असलेल्या व्यवहारांवरुन आरोप केले होते. कंपनी अफेयर्स खात्याकडे आणि ईडीकडे तक्रार ही केली होती.
7 जुलै 2021 ला कृपाशंकर सिंग यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई पालिकेच्या तोंडावर त्यांना उपाध्यक्षपद देण्यात आलंय.
संघाची शिकवण,
किरीट सोमय्यांचे आरोप आणि परिणाम २
2012 मध्ये किरीट सोमय्यांनी भुजबळांविरोधात महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळ्याचा आरोप केला होता.
तसंच शेल कंपन्यांच्यामाध्यमातून शेकडो कोटी रुपयांचं मनी लाँडरिंग केल्याचाही सोमय्या यांचा दावा होता.
2016 मध्ये या प्रकरणी छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळांना अटक झाली.
भुजबळ जवळपास 18 महिने तुरुंगात होते. त्यांनी डिस्चार्ज अप्लीकेशन फाईल केलं. जे कोर्टानं मान्य केलं..
संघाची शिकवण,
किरीट सोमय्यांचे आरोप आणि परिणाम ३
2015 मध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर 800 कोटीच्या मनी लाँडरिंग चा आरोप करत सोमय्या यांनी एसीबीकडे धाव घेतली होती.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी
एफए कन्स्ट्रक्शन कंपनीतून पैसे वळवण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
अजित पवार यांच्यासोबत भाजपनं 80 तासाचं सरकार स्थापन केलं.
त्याच काळात अजित पवारांना एसीबीनं क्लीन चीट दिली.
संघाची शिकवण
किरीट सोमय्यांचे आरोप आणि परिणाम.
2014 मध्ये बबनराव पाचपुते यांनी भरभक्कम परतावा देण्याच्या नावाखाली राज्यात 26 पॉन्झी स्कीम्स चालवून त्यामाध्यमातून 10 लाख लोकांची फसवणूक झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
याची तक्रार करुन मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पाठबळामुळेच हे प्रकरण दाबलं जात असल्याचं सोमय्यांचं म्हणणं होतं.
यात पाचपुतेंचा हात असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता.
2014 च्या निवडणुकीआधीच बबनराव पाचपुते यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र त्यांना निवडणूक जिंकता आली नाही.
संघाची शिकवण , आरोप आणि परिणाम ५
2017 मध्ये किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर 300 कोटींच्या मनी लाँडरिंगचा आरोप केला होता.
अविघ्न रिअल इस्टेटचे कैलाश अग्रवाल यांच्या कंपनीशी हातमिळवणी करुन राणेंनी 300 कोटी रुपये रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये वळवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
नारायण राणेंनी स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला.
त्यानंतर राणेंना आधी राज्यसभा आणि नव्या विस्तारात केंद्रीय मंत्रीपद मिळालं.
संघाची शिकवण
आरोप प्रकरण ६आणि परिणाम
2004 ते 2012 या काळात आदिवासी विकास खात्यातील विविध सरकारी योजनांमध्ये 6 हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तत्कालीन राष्ट्रवादीचे मंत्री विजयकुमार गावितां वर झाला होता.
गंभीर तक्रारीनंतरही 2009 पासून गावितांची चौकशी पेंडिंग ठेवल्याबद्दल सोमय्यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर तोफ
डागली होती.
2014 च्या निवडणुकीआधी विजयकुमार गावित भाजपात दाखल झाले..
त्यांना तिकीट ही मिळालं आणि त्यांची मुलगी दोनदा खासदार म्हणून निवडूनही आली.
संघाची शिकवण!

साभार; निर्मल कुमार

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT