उद्या गणपति ईसरजन ला भविकाच्या नीरोप ची अशी आहे तैयारी

मुंबई
प्रतिनिधि

विसर्जनस्थळी निर्माल्य कलश, प्रकाशझोत, जीवरक्षक, नियंत्रण कक्ष यांसह विविध सुविधा

मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त होणाऱ्या गणेश विसर्जनाची जय्यत तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.
रविवारी मोठय़ा संख्येने घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार असल्याने पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून यंदाही १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्थळे कार्यरत असणार आहेत.
तसेच संपूर्ण मुंबईत २५ हजार  कामगार, कर्मचारी, अधिकारी विविध ठिकाणी उपस्थित असतील.
गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाच्या गणेशोत्सवावरही करोनाचे सावट होते.
या पार्श्वभूमीवर पालिकेने विशेष तयारी केली आहे.
विसर्जन करताना होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदाही पालिकेने १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे.
तसेच ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जनस्थळे असून,
या ठिकाणी महापालिकेद्वारे आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली.
चौपाटय़ांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्याचबरोबर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किनाऱ्यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत यासाठी नैसर्गिक विसर्जनस्थळी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्यवस्था करून तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत.
याचबरोबर ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन,
१८५ नियंत्रण कक्ष,
१४४ प्राथमिक उपचार केंद्र,
३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT