उद्धव ठाकरे आणि आयुक्तांनी स्वत:ची पाठ थोपटून मुंबईकरांची खिल्ली उडवली अशा प्रकारचे वक्तव्य कोण करत आहे ?

images (90)

प्रतिनिधि.

गेल्या 29 /8/2017 तारखे पर्यंत मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते.
आज तिसरा दिवस उजाडला आहे तरी मुंबईकर त्रस्त आहेत.
यांची सर्व जबाबदारी ही राज्यसरकार आणि महानगरपालिकेची आहे .
असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मालिक यांनी केले.

पत्रकार परिषदेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आयुक्तांनी स्वत:ची पाठ थोपटली, ही कृती लोकांची खिल्ली उडवणारी आहे अशी टीका त्यांनी केली.
आपण चांगले काम केल्याचा, मिठी नदीला पूर न आल्याचा दावा त्यांनी केला ,पालिकेने केला आहे.
मुळात मिठी नदीच्या परिसरातच सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

तीन दिवस लोकं आपल्या घरी पोहचू शकले नाही.
आजही जनजीवन पूर्णपणे कार्यान्वित झालेले नाही?
मुख्यमंत्र्यांनी डिजास्टर मॅनेजमेन्ट कार्यालयाला भेटे दिली,
सीसीटीव्ही कॅमेरातून पाहणी करत असल्याची फक्त बतावणी केली.

डिजास्टर मॅनेजमेन्ट डिपार्टमेंट कार्यशील नव्हते!
लोकांना काहीही मदत मिळाली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आजही रस्त्यांवर जागोजागी कचऱ्यांचे ढीग जमाआहेत.
आजार पसरू नये यासाठी कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही.

इमारती पडत आहेत. लोकांचा नाहक जीव जातोय.
पण सरकार एकूण मृतांचा आणि बेपत्ता लोकांचा आकडाही सांगू शकत नाही असे ते म्हणाले.
हजारो करोडोंचं महापालिकेचं बजेट असूनही सत्ताधारी मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यात असमर्थ ठरत आहे.

पुरामुळे दरवर्षी कमी-जास्त प्रमाणात नुकसान होतेच, त्यांची जबाबदारी सरकार आणि महानगरपालिकेची आहे!
उद्धव ठाकरे ‘पाऊस तुम्ही थांबावा’ असं पत्रकारांना म्हणाले.
लोकांनी तुम्हाला जबाबदारी दिली आहे, लोक कर भरतात मात्र महानगरपालिका सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे?
या पुरामुळे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई कोणभरून देणार ?

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT